दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

दलित व्हाइस (मराठी: दलित आवाज) हे भारतातील बंगळूरू येथून प्रकाशित होणारे राजकिय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे पुर्ण नाव "दलित व्हाईस: द व्हाइस ऑफ पर्सीक्युटेड नॅशनालिटीज डिनाईड हुम्यन राईट्स" आहे. हे दर पंधरवड्याला आंतरजाळ्यावर आणि छापील स्वरुपातही प्रकाशित केले जाते. १९८१ साली याची स्थापना व्ही.टी. राजशेखर यांनी केली होती, जे इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक आणि पत्रकार राहिलेले आहेत. हे त्याकाळातील सर्वात जास्त खपाचे दलित नियतकालिक होते. हे नियतकालिक आणि त्याचे संकेतस्थळ २०११ साली बंद करण्यात आले. भूमिका कोलंबिया विद्यापीठ ग्रंथालयाने या मासिकाचे खालील प्रमाणे वर्णन केले आहे, "ह्याचे चारित्र्यच मुळात ब्राम्हणवाद-विरोधी, जातीवाद-विरोधी आणि वर्णद्वेष विरोधी भूमिका असलेले आहे, ह्यांतून ब्राह्मणवादापासून मुक्तीचा पुरस्कार केला जातो. हे स्वत:ला "भारतातील सर्व वंचितांचे, मानव्याचे हनन झालेल्या सर्वांचा प्रवक्ता मानते", — दलित, मागास जाती, ख्रिस्ती, मुसलमान, शीख, महिला — "सर्व आर्य ब्राह्मणवादाच्या वळी ठरलेल्यांचे" या मासिकामधील प्रकाशित लेखांमधून हिंदू धर्म, झीयोनिसम, यहुदी धर्म, साम्यवाद आणि अमेरिकन नव-प्रतिगामीत्ववाद (American neoconservatism) यांच्यावर हल्ला केला गेला.

Comments

Popular posts from this blog

लैंगिकता हक्क

विद्युत भागवत