Posts

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री

दलित व्हाइस (मराठी: दलित आवाज) हे भारतातील बंगळूरू येथून प्रकाशित होणारे राजकिय नियतकालिक होते. सध्याचे ह्या नियतकालिकाचे पुर्ण नाव "दलित व्हाईस: द व्हाइस ऑफ पर्सीक्युटेड नॅशनालिटीज डिनाईड हुम्यन राईट्स" आहे. हे दर पंधरवड्याला आंतरजाळ्यावर आणि छापील स्वरुपातही प्रकाशित केले जाते. १९८१ साली याची स्थापना व्ही.टी. राजशेखर यांनी केली होती, जे इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक आणि पत्रकार राहिलेले आहेत. हे त्याकाळातील सर्वात जास्त खपाचे दलित नियतकालिक होते. हे नियतकालिक आणि त्याचे संकेतस्थळ २०११ साली बंद करण्यात आले. भूमिका कोलंबिया विद्यापीठ ग्रंथालयाने या मासिकाचे खालील प्रमाणे वर्णन केले आहे, "ह्याचे चारित्र्यच मुळात ब्राम्हणवाद-विरोधी, जातीवाद-विरोधी आणि वर्णद्वेष विरोधी भूमिका असलेले आहे, ह्यांतून ब्राह्मणवादापासून मुक्तीचा पुरस्कार केला जातो. हे स्वत:ला "भारतातील सर्व वंचितांचे, मानव्याचे हनन झालेल्या सर्वांचा प्रवक्ता मानते", — दलित, मागास जाती, ख्रिस्ती, मुसलमान, शीख, महिला — "सर्व आर्य ब्राह्मणवादाच्या वळी ठरलेल्यांचे" या मासिकामधील…

लता छत्रे

लता छत्रे या या मराठी लेखिका आहेत. या पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक आहे. त्यांनी बौद्ध तत्वज्ञानावर अनेक संशोधन निबंध आणि पुस्तके लिहिली आहेत.[१] त्या परामर्श या मराठी नियतकालिकाच्या कार्यकारी संपादक आहेत. पुस्तके बौद्ध धर्मातील स्त्रीविचार - बौद्ध धर्म स्त्रीयांविषयी नेमक्या काय सांगतो बुध्दीस्ट प्रमाणशास्त्र, तर्कशास्त्र आणि भाषा - इंग्रजी भाषेतील पुस्तक

विद्युत भागवत

विद्युत भागवत ह्या एक स्त्रीवादी लेखिका, साहित्यिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या आहेत. त्यांनी गेली जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले आहे. त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत. ’मानवशास्त्रातील लिंगभावाची शोध मोहीम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्र सुरू केले आणि वाढविले. विद्युत भागवत यांनी लिहिलेली अन्य पुस्तके वाढत्या मूलत्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने स्त्रीवादी सामाजिक विचार Women's Studies (इंग्रजी) स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन

लैंगिकता हक्क

लैंगिकता हक्क लैंगिकता हक्कांच्या चळवळी ही एक मोठी संकल्पना आहे ज्यात अनेक चळवळी ज्या लैंगिक हक्कांसाठी वेगवेगळ्या मार्गांने आणि सामाजिक स्थानांवरून उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे आपल्याला ढोबळमानाने निम्नानुसार वर्गिकरण करता येते. १) लैंगिक सेवा पुरविणाऱ्यांच्या चळवळी २) समलिंगी आणि उभयलिंगी लैंगिकता असणाऱ्यांच्या चळवळी ३) हिजडे आणि इतर लिंगभाव असलेल्यांच्या हक्कांच्या चळवळी ४) लहान मुलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणाच्या चळवळी